थापाड्या सरकारला आत्मसन्मान आहे की नाही ?- अजित पवार

आश्वासनं पूर्ण करण्याची धमक नसेल तर ती द्यायचीच कशाला?

मुंबई: पंतप्रधानांनी दिलेली दीड हजाराची मानधनवाढ अद्याप प्राप्त न झाल्याने राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून दोन दिवस राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी राज्यभरातील अंगणवाड्या बंद राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. आश्वासनं पूर्ण करण्याची धमक नसेल तर ती द्यायचीच कशाला? ४ महिने उलटले तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने दीड हजार रुपयांची वेतनवाढ दिलेली नाही. या थापाड्या सरकारच्या विरोधात कुणी आणि किती आंदोलनं पुकारावीत?यांच्याकडं आत्मसन्मान आहे की नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)