थाई कंपन्यांकडून 20 हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई – थायलंडमधील कंपन्यांकडून देशात पुढील काही महिन्यांत 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या कंपन्या देशात कार्यरत असून त्या ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि धातू यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक करतील. थायलंडमधील कंपन्यांना भारतामध्ये चांगली संधी आहे.

भारत ही सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याने थाई गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. 2020 पर्यंत भारतात 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येईल, असे थाई व्यापार केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक सुविमोल तिलोप्रुन्गचाई यांनी सांगितले. गेल्या सात दशकांपासून थायलंडमधील कंपन्यांची भारतात गुंतवणूक आहे.

भारत आणि थायलंड सरकार यांच्यातील सकारात्मक द्वीपक्षीय संबंधामुळे व्यापार वाढत असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या काही दशकांपासून पायाभूत सुविधा, स्थावर मालमत्ता, अन्न प्रक्रिया, रसायने, हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात 30 कंपन्या कार्यरत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)