“थर्टी फस्ट’च्या पूर्वसंध्येला 127 तळीरामांवर कारवाई

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतुकीच्या नियमांसह “ड्रंक अँड ड्राइव्ह’वर देखील पोलिसांची करडी नजर आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. रविवारी (दि. 30) पोलिसांनी 127 दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर कारवाई केली आहे.

दारू पिऊन वाहन चालविणे स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेस धोका पोहोचवणारे आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे सध्या 15 “ब्रीथ ऍनालायझर’ आहेत. त्यापैकी आठ नादुरुस्त आहेत. तसेच ऑनलाइन चलन करण्यासाठी 63 यंत्रे आहेत. आणखी 145 यंत्रांची मागणी पोलिसांनी सरकारकडे केली आहे. या माध्यमातून तळीराम झालेल्या वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. परिमंडळ एकच्या हद्दीत 69 आणि परिमंडळ दोनच्या हद्दीत 58 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले, मद्य प्राशन करून वाहन चालविणे धोक्‍याचे आहे. यामुळे अनेकदा अपघात होतात. फक्त 31 डिसेंबरच्या रात्री मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केल्यास मोठा विरोध होतो. यामुळे गुरुवारपासूनच (दि. 27) मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

पोलीस स्टेशन व कारवाईची संख्या
परिमंडळ एक
पिंपरी – 10
चिंचवड – 04
निगडी – 12
भोसरी – 06
एमआयडीसी भोसरी – 10
दिघी – 12
चाकण – 14
आळंदी – 01
—-
परिमंडळ दोन
सांगवी – 05
वाकड – 23
हिंजवडी – 05
चिखली – 14
तळेगाव – 08
तळेगाव एमआयडीसी – 03


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)