‘थर्टी फर्स्ट’साठी तगडा बंदोबस्त

पिंपरी – नववर्षाच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 1100 पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 30) रात्रीपासूनच शहरातील मुख्य रस्त्यांवरील चौकात वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये, याकरिता पोलीस व वाहतूक शाखेच्या वतीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. परिमंडळ तीन अंतर्गत पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, 20 पोलीस निरिक्षक, 137 सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, 670 कर्मचारी. याशिवाय गुन्हे शाखेचे एक पोलीस निरिक्षक, 2 सहाय्यक पोलीस निरिक्षक, 1 पोलीस उपनिरिक्षक, 25 कर्मचारी याशिवाय शीघ्र कृतीदल तुकडी, दंगल नियंत्रक पथक असा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय सर्व वाहतूक विभागांचे पोलीस कर्मचारी देखील या बंदोबस्तामध्ये सहभागी होणार आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)