“थर्टी फर्स्ट’ला पहाटेपर्यंत “झिंग झिंग झिंगाट’

पिंपरी – नववर्षाच्या स्वागतासाठी केवळ तरुणाईच नाही तर या काळात कोणतीही अनुचित कारवाई होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा व राज्य उत्पादन शुल्क कर्मचारीही तयारी लागले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार शहरातील मद्य विक्रीची दुकाने पहाटे दीड वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तर हॉटेल्स हे पार्टीसाठी पहाटे पाच वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

यासाठी शहरात पिंपरी- चिंचवड आयुक्तांनी गुरुवार (दि. 27) पासूनच शहरात ड्रंक ऍन्ड ड्राईव्हची तपासणी व कारवाई केली जात आहे. शहरात होणारी बेकायदेशीर दारु विक्रीवरही कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी केलेल्या कारवाईतही बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 240 गावठी, 140 ताडी व झेन कार असा 89 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुख्य ठिकाणी पोलीस आयुक्तालयातर्फे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सद्यस्थितीला पोलीस आयुक्तालयाकडे एकूण 15 ब्रिथींग मशीन व 63 चलन मशीन आहेत. त्याद्वारे संपूर्ण शहरात ही कारवाई केली जाणार आहे. तर 1 जानेवारीपर्यंत आयुक्तालयाकडे नवीन 150 ब्रिथींग मशीन दिल्या जाणार आहेत.

यावेळी हॉटेलच्या छतावर कोठेही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे रुफ टॉप पार्टीवर पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. यावेळी मद्य विक्रीची दुकाने रात्री दीड तर हॉटेल व बार हे पहाटे पाच वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार हा नियम 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तरुणाईला सेलिब्रेशन करताना मद्य परवाना व इतर नियमांचे पालन करत सेलिब्रेशन करण्याचे आवाहन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)