थर्टीफर्स्टसाठी महाबळेश्‍वरमध्ये पर्यटकांची रेलचेल

घोडेस्वारी, नौकाविहिरासाठी वेण्णालेकवर ओसंडली गर्दी
महाबळेश्वर, दि. 26 (प्रतिनिधी) – सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्‍वरमध्ये पर्यटकांनी रेलचेल केली आहे. सध्या वेण्णालेकच्या जलाशयात नौकाविहार करण्यासाठी आणि घोडेस्वारी करण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी ओसंडली आहे.
महाबळेश्वरमध्ये नाताळ हंगाम व नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर नगरी सज्ज झाली आहे. प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटक गर्दी करीत आहेत. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेकला पर्यटनास पर्यटक नौकाविहाराचा आनंद लुटण्यासोबातच घोडेसवारीची मज्जा लुटत आहेत. महाबळेश्वर या पर्यटनस्थळी महाराष्ट्रासह देशासह परदेशातून लाखो पर्यटक दाखल होत आहेत. नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरनगरी सज्ज झाली असून पर्यटकांच्या गर्दीने हे ठिकाण फुलून गेले आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी मुख्य बाजारपेठ देखील सज्ज झाली असून येथील प्रसिद्ध वस्तूंच्या पदार्थांच्या खरेदीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. येथील प्रसिद्ध चपल्स, चणे, जॅम जेली, फज खरेदीबरोबरच लाललाल, चटकदार स्ट्रॉबेरी खरेदीसाठी देखील गर्दी होताना दिसत आहे. महाबळेश्वर मधील केट्‌स पॉईंट, ऑर्थरसीट, लॉडविक, मुंबई पॉईन्ट या प्रेक्षणीय स्थळांसह श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. चणे जाम, जेली, गरमागरम मका कणीस, मका पॅटिस व येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी पर्यटकांना आकर्षित करीत आहे. ऐन थंडीत देखील पर्यटक येथील प्रसिद्ध स्ट्रोबेरी ज्युस, क्रीम, आईसक्रीम, आईस गोळ्याच्या गाड्यांवर गर्दी होताना दिसत आहेत. वेण्णालेक, मुंबई पॉईंट या परिसरामध्ये घोडेसवारीचा देखील आनंद लुटताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असून सध्या सहली देखील मोठ्या प्रमाणात येथे येत आहेत. हॉटेल्स लॉजेससाठी पर्यटक विविध साईट्‌सच्या माध्यमातून “ऑनलाइन बुकिंग’ चा वापर करताना पाहावयास मिळत आहेत. महाबळेश्वरचे वैभव असलेले वेण्णालेकला चौपाटीचे स्वरूप आले असून हा संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला आहे. पर्यटक नौकाविहारासोबतच चटपटीत पदार्थांवर ताव मारताना पाहावयास मिळत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)