नवी दिल्ली: ज्येष्ठ कॉंग्रेस नेते शशी थरूर यांना जिनीव्हा येथे जाण्यास दिल्लीच्या न्यायालयाने अनुमती दिली आहे. संयुक्तराष्ट्र संघाचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी तसेच केरळातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करण्यासाठी थरूर तिकडे जात आहेत. थरूर यांनी संयुक्त राष्ट्र संघात अन्नान यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्ष काम केले आहे.

थरूर हे आपली पत्नी सुनंदा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आरोपी असून सध्या ते जामीनावर आहेत. त्यामुळे त्यांना विदेशात जाण्यासाठी कोर्टाची अनुमती आवश्‍यक आहे. आपल्या विदेश दौऱ्याचा तपशील तपास अधिकाऱ्यांच्या कानी घाला अशी सुचना न्यायालयाने त्यांना अनुमती देताना केली आहे. तथापी आज सायंकाळी थरूर तिकडे जातील आणि उद्या लगेचच ते परत येतील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)