नवी दिल्ली – शशी थरूर यांचे वक्‍तव्य कॉंग्रेस पक्षाने फेटाळले आहे. थरूर यांनी बोलताना शब्द जपून वापरावेत अशी सूचनाही करण्यात आली आहे. थरूर यांच्या वक्‍तव्यावर कॉंग्रेसचे माध्यम प्रमुख रणदीप सुर्जेवाला यांनी ट्‌विट केले आहे. “भारताची मूल्ये आणि मूलभूत सिद्धांत हे आपल्या समाज संस्कृतीसाठी अपरिवर्तनीय आहेत. याच मूल्यांमुळे भारताला पाकिस्तानच्या विभाजनवादी संकल्पनेपासून वेगळे राखले आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे.

कॉग्रेसच्या सर्व नेत्यांनी शब्दांचा आणि वाक्‍प्रचारांचा वापर जपून करावा, असे सांगून सुर्जेवाला यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले. मोदी सरकारने गेल्या चार वर्षात देशात धर्मांध, द्वेष, असहिष्णूतेने विभाजन आणि ध्रुवीकरणाचे वातावरण तयार केले. देशातील धर्म आणि वंशांमध्ये बहुविधता, दयाळूपणा आणि सौहार्दतेचे वातावरण कॉंग्रेसने जपले आहे, असेही सुर्जेवाला यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)