थरूर यांची रविशंकर प्रसाद यांना नोटीस 

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत भारतीय जनता पार्टी आणि केंद्रातील मोदी सरकार यांची बाजू जोरकसपणे मांडणारे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद अडचणीत आले असून त्यांना आज बॅकफूटवर जावे लागले आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशी थरूर यांना हत्या प्रकरणातील आरोपी म्हटल्यामुळे थरूर यांच्यावतीने प्रसाद यांना नोटीस पाठवण्यात आली असून 48 तासांच्या आत बिनशर्त माफी मागण्यास सांगण्यात आले आहे.

शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी न्यायालयात खटला सुरू असला तरी त्यांना हत्येचा आरोपी म्हटले नसल्याकडे प्रसाद यांना पाठवलेल्या नोटीशीत म्हटले असून कनिष्ठ न्यायालयात थरूर यांच्या विरोधात कोणताही आरोप नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. थरूर हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे आपले वक्‍तव्य वेगळाच हेतू दर्शविणारे असल्याची टीकाही या नोटीशीत करण्यात आली आहे. प्रसाद यांनी थरूर यांची बदनामी करणारी क्‍लीप सोशल मीडियावरून तात्काळ हटवावी आणि 48 तासांत बिनशर्त माफी मागावी असेही त्यांना बजावण्यात आले आहे. या प्रकरणात खुद्द थरूर यांनी ट्‌वीट करून प्रसाद यांच्यावर टीका केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)