थरमॅक्‍स चौकात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर

भोसरी – सध्याच्या लहरी वातावरणामुळे आजार खूपच बळावले आहेत. त्यात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरु नये, याची विशेष काळजी घेणे हे पालिकेचे मुख्य काम आहे. परंतु पालिका प्रशासन नेहमीच आपल्या निष्काळजीपणाची उदाहरणे नागरिकांसमोर मांडत असते. असेच एक उदाहरण बनून थरमॅक्‍स चौकात गेल्या आठ दिवसापासून तुंबून रस्त्यावर वाहत असलेले ड्रेनेजचे घाण पाणी वाहत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून ड्रेनेजचा चेंबर तुंबला आहे आणि घाण पाणी रस्यावर सर्वत्र पसरत आहे. या पाण्याचा घाण वास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. तसेच येथील व्यापारी वर्गास आणि वाहनचालकांनाही आता या घाण पाण्याचा त्रास होऊ लागला आहे. थरमॅक्‍स चौकातील कुंदन हुंडाई शोरुम समोर गेल्या आठ दिवसापासून ड्रेनेजच्या चेंबरमधून पाणी वाहत आहे. पालिका अशा समस्यांकडे ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरीक करत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत पालिका प्रशासनाने तातडीने ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)