थकीत पगार द्या अन्यथा संप पुकारणार

प्रतापगड कारखाना कामगारांचा इशारा

सातारा – प्रतापगड सह.साखर कारखाना हा किसनवीर कारखान्याने चालवायला घेतला असून त्या व्यवस्थापनाने एप्रिल महिन्यांपासून पगार न दिल्याने कामगारांनी दि.29 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबतचे निवेदन शुक्रवारी संचालक व कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना देत मध्यस्थी करण्याचे आवाहन केले.

-Ads-

संबधित कामगार मागील 13 वर्षापासून कारखान्यावर कामाला आहेत. मात्र, किसनवीर व्यवस्थापनाने एप्रिलपासून पगार तसेच 15 टक्के पगारवाढ व त्याचा फरक दिला नाही. याबाबत किसनवीर व्यवस्थापनाकडे वारंवार दाद मागून देखील त्यांच्याकडून प्रतिसाद देण्यात आला नाही.

त्यामुळे आता दि.29 नोव्हेंबरपासून प्रतापगड कारखान्याच्या गेटवर संप करण्यात येणार आहे. परंतु जमावबंदी नावाखाली मेढा पोलीस प्रशासनाकडून लोकशाही व शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यापासून रोखले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून मागण्या मान्य कराव्यात अथवा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)