थकीत दंड वसुलीसाठी पोलीस सरसावले

महिनोंमहीने भरला जात नसल्याने वाढ : चौकाचौकात वाहन तपासणी

– दुपारी 3 ते 5 दरम्यान तपासणी मोहीम
– दंड भरणाऱ्यांची संख्या अत्यल्प
– काही वाहनांवर पाच ते सात हजारांपेक्षा जास्त दंड
– नागरिकांनी स्वतःहून दंड भरण्याचे आवाहन

पुणे – वाहतूक नियमभंगापोटी लावण्यात आलेला दंड काही कालावधीनंतर भरण्यासाठी चालकांना मुभा देण्यात येते. मात्र, काही महाभागांकडून महिनोंमहीने तो भरला जात नसल्याने थकीत दंडाची रक्‍कम वाढत चालली आहे. ही बाब आता वाहतूक पोलिसांनी मनावर घेतली असून चौकाचौकात वाहन तपासणी करून तो वसूल केला जात आहे.

-Ads-

वाहतूक पोलिसांची संख्या पाहता प्रत्येक चौकात पोलीस उभा करणे शक्‍य नसल्याने काही प्रमुख ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून बेशिस्तांवर लक्ष ठेवण्यात येते. तर, काही ठिकाणी स्वतः पोलिसांकडून कारवाई केली जाते. नियमनादरम्यान सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग ओलांडणे, मोबाईलवर बोलणाऱ्यांना बाजूला घेऊन दंड लावण्यात येतो.

यावेळी एखाद्याकडे पैसे नसल्यास त्याच्या नंबरवर दंड टाकून तो नंतर भरण्यास सांगितले जाते. मात्र, स्वतःहून दंड भरणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने वाहतूक पोलिसांकडील थकीत दंडाची रक्‍कम वाढत चालली आहे. यामुळे दररोज दुपारी 3 ते 5 दरम्यान ठिकठिकाणच्या चौकात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी वाहनांची तपासणी करून दंड भरण्यास सांगितले जात आहे.

दरम्यान, काही चालकांच्या वाहनांवरील दंड हा पाच ते सात हजार रुपयांपेक्षाही जास्त होत चालला असल्याने ही तपासणी करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच, नागरिकांनी स्वतःहून दंड भरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

पीक अव्हर्समध्ये तपासणी नाही
पीक अव्हर्स दरम्यान रस्त्यावरील वाहनांची संख्या जास्त असल्याने या कालावधीत नियमनाला प्राधान्य दिले जात आहे. या कालावधीत वाहतूक सुरळीत ठेऊन कमी गर्दीच्या वेळी दुपारी ही मोहीम राबवण्यात येत आहे. यामुळे वाहतुकीला कुठलाही अडथळा येत नसून दंडही वसूल केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)