थकित बिलामुळे शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या खंडित करणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई : वीज बील भरले नसले तरी राज्यातील शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या खंडित करणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली.यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, वीज बील थकबाकीपोटी राज्यातील शेतकरी ग्रामपंचायतींकडे 17 हजार कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाने सूचना केली होती.

मात्र शेतकरी बांधवांची मागणी पाहता ही वसुली मोहिम स्थगित करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींची वीज बिले राज्य शासनाने भरण्याचा निर्णय घेतला आहे. वीज बील न भरता शेतकरी बांधवांची वीज जोडणी खंडित केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)