थकबाकीदार संचालकांवर कारवाईचा बडगा

  • पहिल्या टप्प्यात वडगाव, तळेगाव स्टेशन, महागाव अजिवलीच्या थकबाकीदारांना नोटीस

तळेगाव दाभाडे – मावळ तालुक्‍यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांनी पीक व मध्यम मुदत कर्ज घेलते असून, संस्थेने वारंवार लेखी सूचना देऊनही ज्या थकबाकीदार संचालकांनी कर्जाची रक्कम भरली नाही, त्या संचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी दिली. ज्या संचालकांनी संस्थेचे कर्ज थकविले आहे, त्या संचालकांची धारण केलेली पात्रता रद्द करण्याच्या कारवाईच्या लेखी सूचना सोमवारी (दि. 25) पाठविल्या आहेत. सध्या मावळातील वडगाव, तळेगाव स्टेशन, महागाव व अजिवली या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांना लेखी सूचना पाठविल्या आहेत.

मावळ तालुक्‍यात एकूण 55 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असून, त्यात अनेक संचालकांनी पीक व मध्यम मुदतीचे कर्ज घेतले आहे. त्या संचालकांना संस्थेने वेळोवेळी घेतलेले कर्ज परत करण्याच्या लेखी व तोंडी सूचना केल्या आहे. तसेच संचालक ते कर्ज परत करत नसल्याने संस्थेच्या सचिवांनी मावळ तालुका सहाय्यक निबंधक सहाकारी संस्था कार्यालयात लेखी तक्रार केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क अ (फ) (2) अन्वये ज्या संचालकांनी संस्थेचे कर्ज थकविले आहे. त्या संचालकांची धारण केलेली पात्रता रद्द करण्याच्या कारवाईच्या लेखी सूचना पाठविल्या आहेत. पहिल्या टप्प्यात मावळातील वडगाव, तळेगाव स्टेशन, महागाव अजिवली संस्थेचे थकबाकीदार संचालकांवर कारवाई करण्यात येत असून उर्वरित 51 संस्थांच्या थकबाकीदारांवर कारवाई सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)