थकबाकीदारांनी घेतला बॅंडचा धसका

एका दिवसात साडेसहा कोटींची थकबाकी पालिकेच्या तिजोरीत

पुणे – मिळकतकर थकबाकीसाठी महापालिकेकडून थकबाकीदारांच्या दारात बॅंड वाजविण्यास सुरुवात करताच, आपल्याही दारात बॅंड वाजण्याचा धसका घेतलेल्यांनी एका दिवसात पालिकेच्या तिजोरीत तब्बल साडेसहा कोटींचा कर जमा केला आहे.

-Ads-

शहरात सुमारे 8 लाख 85 हजार मिळकतधारक असून त्यातील 6 लाख 15 हजार मिळकतधारकांनी 1 एप्रिलपासून सुमारे 894 कोटी रुपयांचा मिळकतकर पालिकेस जमा केला आहे. तर अद्यापही सुमारे 2 लाख 70 हजार मिळकतधारकांनी कर भरलेला नाही. त्यामुळे महापालिकेकडून या मिळकतधारकांच्या कर वसुलीसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून बॅंड पथके नेमून थकबाकी वसुलीचे काम सुरू केले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात 50 लाखांपेक्षा अधिक कर असलेल्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यांतर्गत या बॅंड पथकाने मागील पाच दिवसांत सुमारे 208 मिळकतधारकांच्या घरासमोर वादन करण्यासाठी जाताच तब्बल 7 कोटी 95 लाख 73 हजार रुपयांचा महसूल जमा झाला असून त्यातील 6 कोटी 50 लाख रुपयांची वसुली 1 डिसेंबर या एकाच दिवशी करण्यात आली आहे. महापालिकेचे बॅंड दारात वाजण्याच्या भीतीपोटी या थकबाकीदारांनी ही रक्‍कम पालिकेस तातडीने भरली आहे.

5 मिळकतींना ठोकले टाळे
महापालिकेकडून पुढील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबविण्यात येणार असून थकबाकीदारांनी तातडीने रक्‍कम जमा करावी, असे आवाहन कर संकलन विभागाचे प्रमुख उपायुक्त विलास कानडे यांनी केले आहे. या कारवाईत आतापर्यंत पालिकेने 5 मिळकती सील केल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)