थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव आता ऑनलाईन

केंद्र सरकारच्या एका योजनेनुसार बॅंकांच्या मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता ही ई-लिलावाद्वारे करण्याची तयारी केली जात आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यापुढे बॅंकांच्या थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव आता ऑनलाइनवर खुला केला जाईल. विशेष म्हणजे सर्व बॅंकांसाठी एकच प्लॅटफॉर्म असणार आहे. मालमत्तेशी संबंधित सर्व माहितीची खातरजमा केल्यानंतर आणि तपासणी केल्यानंतर ती मालमत्ता पोर्टलवर अपलोड केली जाईल. अशा प्रकारचा लिलाव टाळण्यासाठी बॅंका जुलै ते सप्टेंबर यादरम्यान तिमाहीत थकबाकीदारांकडून मोठ्या प्रमाणात वसुली करेल, अशी आशा केंद्र सरकारला आहे.

– राकेश माने

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)