थकबाकीदारांच्या घरासमोर “बॅन्ड’

मोबाइल टॉवर असलेल्या मिळकतदारांकडूनही वसुली करणार


666 कोटी मोबाइल कंपन्यांकडील थकबाकी

पुणे – मिळकतकर थकबाकीदारांच्या मिळकतींसमोर सोमवारपासून “बॅन्डबाजा’ वाजणार असून, त्यामध्ये ज्या मिळकतींवर मोबाईल टॉवर उभे आहेत त्या मिळकतकरधारकांचाही समावेश असणार आहे.

थकबाकी वसुली मोहीम सोमवारपासून सुरू होत आहे. महापालिका दरवर्षीच अनेक पद्धतीने मिळकतकराची थकबाकी वसूल करते. त्यामध्ये “अभय’सारख्या योजनांचाही समावेश होता. तसेच अनेकदा मिळकतींसमोर “बॅन्डबाजा’ही वाजवला जात होता. यावर्षीही बॅन्ड वाजवून वसुली करण्याचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

-Ads-

या बॅन्डबरोबर महापालिकेचे अधिकारी तेथे वसुलीसाठी उपस्थित असणार आहेत. यंदा मोबाइल टॉवर ज्या इमारतींवर आहेत, त्या मिळकतदारांकडून मोबाइल टॉवरवाल्यांच्या थकबाकीची वसुली केली जाणार आहे. मोबाइल कंपन्यांकडे सुमारे 666 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तुम्ही टॉवर कंपन्यांकडून ती वसूल करा, अन्यथा ती तुम्हांला भरावी लागेल अशा स्वरूपाची तंबी मिळकतकरधारकांना देण्यात आली आहे.

मोबाइल टॉवर कंपन्या ते पैसे देऊ शकत नसतील, तर तुम्हीच त्यांना टॉवर उभारण्याचा करार खंडीत करून काढून टाका असेही या माध्यमातून सुचवण्यात येणार आहे.

मोबाइल कंपन्या न्यायालयात गेल्याने यासंबंधातील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे राज्यसरकारकडून याबाबत अभिप्राय मागवण्यात आला होता. त्यामध्ये राज्यसरकारने टॉवर ज्या जागेवर उभे आहेत त्या मिळकतधारकांकडून वसूल करण्यासंबंधीच्या सूचना दिल्याचे, मिळकतकर आकारणी, संकलन प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले. त्याप्रमाणे ही कार्यवाही करण्यात येत असल्याचे कानडे यांनी नमूद केले. आपल्या मिळकतींसमोर बॅण्ड वाजू द्यायचा नसेल, तर थकबाकीदारांनी थकबाकी लवकरात लवकर भरावी, असे आवाहन कानडे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)