थंड चहा दिल्याने पत्नीला मारहाण

पिंपरी – थंड चहा दिला म्हणून पतीने पत्नीला रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी साडेआठच्या सुमारास भोसरी एमआयडीसीतील खंडेवस्ती झोपडपट्टी येथे घडली.

याप्रकरणी पत्नी कविता महेंद्र भालेराव (वय-30) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती महेंद्र भीमराव भालेराव (वय-32) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र याने पत्नी कविता यांना चहा मागितला. कविता यांनी चहा आणून दिला. मात्र तो चहा थंड होता. यामुळे महेंद याने चिडून शिवीगाळ केली व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच कविता घराबाहेर जात असताना महेंद्र याने कठीण वस्तूने त्यांना मारले. यामध्ये कविता जखमी झाल्या. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)