थंडीने नव्हे तर पावसाने जिल्हा गारठला

सातारा – सोमवारी मध्यरात्री तसेच मंगळवारी सकाळच्या वेळेत सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने रब्बी हंगामाचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पुन्हा अवकाळी पावसाने सलग दीड तास जोर धरल्याने गुलाबी थंडीपेक्षा पावसानेच वातावरण गारठले.

महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागलेली असताना राज्यातील अनेक भागात सोमवारी पावसाने अचानक हजेरी लावली. कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. तर, राज्यभरात सर्वत्र ऊन आणि नंतर ढगाळ वातावरण होते. कोकण, गोवा, उत्तर-मध्य आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मंगळवारी पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता . त्या अंदाजानुसार साताऱ्यासह म’श्वर, वाई, खंडाळा, जावली या चार तालुक्‍यात सकाळी साडेसात वाजल्यापासून दीड तास जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा माण व खटाव तालुक्‍यात तीव्र आहेत. रब्बीच्या लागवडीचे क्षेत्र सुमारे 18 टक्‍क्‍यांनी घटले आहे. 44 हजार हेक्‍टर क्षेत्रांपैकी केवळ 22 हजार हेक्‍टरवर पेरा झाला आहे. या पावसाने या हंगामावर परिणाम होण्याची भीती कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांना फटका पश्‍चिम महाराष्ट्रातील साताऱ्यासह सांगली, कोल्हापूरसह, सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्‍यता असून सांगलीतील द्राक्ष उत्पादकही या अवकाळी पावसाने चिंतेत सापडला आहे. सुगीच्या काळात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागात सोमवारी पहाटे विजेच्या कडकडाटासह जोरदार तर, सायंकाळीही हलका पाऊस झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)