थंडीच्या तीव्रतेने खोबरे तेल थिजलेलेच!

नगरचे किमान तापमान 7.1 : राज्यात नीचांकी नोंद

नगर – आठवड्यापासून असलेला थंडीचा तडाखा नगरकर आजही अनुभवत आहे. नगरचे शुक्रवारच्या किमान तापमानाची नोंद राज्यात नीचांकी झाली आहे. किमान तापमान 7.1 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले आहे. कमाल तापमानात काहीशी वाढ नोंदवली गेली आहे. ते 33.4 अंश सेल्सिअस एवढे आहे. तरी देखील थंडीचा तडाखा कायम आहे. मकरसंक्रांतीपर्यंत थंडीचा लाट राज्यात राहणार असल्याचा स्थानिक हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील इमारतींमुळे थंडीची जाणिव काहीशी कमी होते. परंतु नगर शहरात थंडी कायम आहे. ग्रामीण भागातील जनजीवन थंडीमुळे अजूनही विस्कळीत आहे. शेतकरी थंडीचा प्रभाव कमी झाल्याचा अंदाज बांधण्यासाठी आजही बाटलीतील खोबरेतेल पाहतो. नगरच्या थंडीचा तडाखा एवढा आहे की, गेल्या पंधरा दिवसांपासून बाटलीमधले खोबरेतेल हे थिजलेले आहे. मकारसंक्रांतीनंतर दिवस मोठा होत जातो, आणि रात्र लहान होत जाते.

परिणामी उन्हाळ्याचा चाहूल लागते. दिवस तिळातिळाने वाढतो, असे सांगितले जाते. यावर्षी थंडीची चाहूल काहीशी उशिराच लागली आहे. परिणामी थंडीची तीव्रता कायम आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आणखी काही दिवस तीव्र आहे. परिणामी राज्यात देखील थंडी कायम जाणवत राहणार आहे, असे स्थानिक हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात दररोज लक्षणीय घट नोंदवली जात आहे. यावरून थंडीची तीव्रता कायम आहे. रत्नागिरी 17.5, पुणे 9.7, नगर 7.1, कोल्हापूर 14.7, नाशिक 8.4, सांगली 11.3, सोलापूर 16.2, परभणी 11.5, नांदेड 13.5, अकोले 10.9, अमरावती 11.6, बुलढाणा 12.6, चंद्रपूर 11.2, गोंदिया 10.0, नागपूर 8.2, वाशीम 12.2, वधा2 10.8, यवतमाळ 12.0, असे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये किमान तापमानाची नोंद झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)