थंडीची लाट राज्यभर कायम

पुण्याचा पारा 6 अंशांवर : दुपारीही गारठा

पुणे – उत्तर भारतातील राज्यांकडून येणाऱ्या शीत लहरींनी महाराष्ट्रावर अक्षरश: स्वारी केली आहे. राज्यात सर्वदूर किमान तापमानात घट होत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्याला हुडहुडी भरली आहे. थंडीचा कडाका प्रचंड असल्याने भर दुपारीही गारठा जाणवत आहे. राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यात रविवारी 6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जम्मू-काश्‍मीर व हिमालय पर्वताच्या भागात पश्‍चिमी चक्रावात सक्रिय आहे. त्यामुळे लगतच्या राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून, उत्तरेकडून शीत वाऱ्यांचे तीव्र प्रवाह महाराष्ट्राकडे येत आहेत. हे वारे जमीनलगतच्या भागातून वाहत असल्याने तापमानात मोठी घट होऊन राज्यात थंडीचा कडाका वाढल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. नागपूर येथे किमान तापमानात तब्बल 9 अंश सेल्सिअसची घट झाली आहे. किमान तापमान 10 अंशांच्या खाली आले असताना सरासरीपेक्षा 4.5 अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर 6.5 अंशांची घट झाल्यास तीव्र लाट समजण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)