थंडीचा जोर ओसरला, पुण्यात उकाडा

पुणे – राज्यात गेल्या आठवड्यात असणारा थंडीचा जोर आता कमी झाला असून सोमवारी पुणे शहरातील तापमान हे 14 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. तर, दिवसा काही अंशी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाड्याचे प्रमाण जाणवत होते.

राज्यातील विदर्भ वगळता अन्य कुठेही सध्या थंडीची लाट नाही. विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांतील तापमान 8 ते 9 अंशांदरम्यान होते. सर्वात नीचांकी तापमान हे नागपू मध्ये 7.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा सतत वाढत आहे. सोमवारी पुण्यातील तापमान हे 14.7 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, येत्या 48 तासांत तापमान हे 12 अंशांपर्यंत घसरण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)