थंडीचा जोर आणखी दोन दिवस

File Pic

नगरमध्ये नीचांकी 4.6 अंश से. तापमान


पुण्याचा पारा 6.9 अंश सेल्सिअसवर

पुणे – वर्षाच्या अखेरच्या दिवशीही राज्यात सर्वत्र थंडीची लाट कायम होती. पुण्यात सोमवारी किमान तापमान 6.9 अंश सेल्सिअस, तर राज्यात सर्वांत कमी तापमान हे नगरमध्ये 4.6 अंश सेल्सिअस होते. राज्यात असणारी थंडीची लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे.

सध्या राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी तापमान हे 10 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेले आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी महाराष्ट्रात विना अडथळा पोहचत असल्याने थंडी वाढली आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे. विदर्भात कडाक्‍याच्या थंडी लाट आली असून अनेक भागातील तापमान हे सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी कमी झाले आहे. नागपूरमध्ये सोमवारी 5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर गोंदियामध्ये 5.8 अंश सेल्सिअस होते. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्यात उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यातही गेले दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा पाच ते सहा अंशांदरम्यान राहिला हे तापमान सरासरी पेक्षा 3.7 अंशांनी कमी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)