त्रिबंधात्मक प्राणायाम करतानाची बैठक स्थिती

प्राणायाम करताना कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसावे. पद्मासन, भद्रासन,व्रजासन, सिद्धासन सहजासन किंवा साधी मांडी घालावी. काहीवेळा वयोमानामुळे काही व्यक्‍ती कोणत्याही आसनात बसू शकत नाहीत. अशा व्यक्‍तींनी मग खुर्चीवर पण सरळ बसावे आपले मेरुदंड सरळ ठेवावेत. प्राणायाम करताना सरळ बैठकास्थितीत बसावे त्यामुळे सर्व चक्रांची जागृती होते व प्राणशक्‍तीही वाढीस लागते मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी प्राणायामाची बैठकास्थितीची अवस्था उत्तम असणे आवश्‍यक आहे.

प्राणायामाच्या सात संपूर्णप्रक्रियांचा अभ्यास योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावा.
प्रत्येक प्राणायामाच्या प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये आहेत. वैज्ञानिक व अध्यात्मिक बैठक असलेल्या संपूर्ण शास्त्रशुद्ध अशा प्राणायामाच्या सात अवस्था आहेत. हे प्राणायाम 20 मिनिटे रोज या पद्धतीने केले असता त्याचा आपली प्रकृती उत्तम रहाण्यास उपयोग तर होतोच पण आपले संपूर्ण जीवनच आनंददायी होते. प्राणायामाचे प्रत्यक्ष शरीर प्रकृतीस अनेक फायदे होतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)