त्रिपूरारी पौर्णिमेनिमित्त लोहगडावर दीपोत्सव साजरा

पवनानगर – मावळ तालुक्‍यातील किल्ले लोहगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा शिलेदार. संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड किल्ल्यांचे या ध्येयाने प्रेरीत होऊन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड, विसापूर विकास मंच गेली 18 वर्षे या किल्ल्यांचे दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहेत.

शंभू महादेवाने कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासूर राक्षसाचा वध करून पृथ्वी तलावरील त्याच्या अत्याचाराचा अंत केला. अन्यायावर सत्याचा विजय म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. किल्ले लोहगडावर शिवकालीन त्र्यंबक महादेवाचे पुरातन मंदिर आहे. मंचाच्या वतीने दरवर्षी लोहगडावर त्रिपुरारी पौर्णिमेला भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी देखील मंचाच्या वतीने लोहगड किल्ला, शिवस्मारक व मारुती मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

-Ads-

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकरामदास इंगवले यांच्या हस्ते गडपूजन व शिवस्मारकवर पुष्पहार अर्पण केली. दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. लोहगडावर स्वतः येऊन त्यांनी मंचाच्या कार्याची माहिती घेतली. लोहगड गावातील घरोघरी अंगणात रांगोळ्या व दीपोत्सव करण्यात आला. गावातील महिला उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. संपूर्ण गड परिसर लखलखत्या पणत्या व मशालींनी उजळून निघाला होता.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, गणेश धानिवले, रमेश बैकर, शत्रुघ्न बैकर, राजू शेळके, राजू चिव्हे, दिघे काका आदी उपस्थित होते. या वेळी लोहगड, घेरेवाडी, भाजे, मळवली, पवनानगर, लोणावळा व गड परिसरातील नागरिक उपस्थित होते. दीपोत्सवाचे नियोजन संदीप गाडे, सचिन निंबाळकर, सागर कुंभार, गणेश उंडे, विश्‍वनाथ जोशी, अमोल गोरे, अनिकेत आंबेकर, चेतन जोशी, विश्‍वास दौंडकर, संदीप भालेकर, राहुल वाघमारे, अजय मयेकर, सोमनाथ बैकर, महेंद्र बैकर, अक्षय बैकर, संदीप बैकर, गणपत ढाकोळ, बाळू ढाकोळ, पंकज गाडे, अरुण काकडे, गौरव गरवड आदी कार्यकर्त्यांनी केले.

दीपोत्सवामुळे युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन गडकिल्ल्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी योग्य दिशा मिळत असल्याची माहिती मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)