त्रिपुरामध्ये विकासाची गंगा ; राज्यासाठी सरकारकडून ८ हजार कोटींच्या नव्या योजना

नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये तब्बल २५ वर्षानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता भाजपने उलटून लावली आहे. दरम्यान, इथल्या भाजप सरकारने एक महिन्याच्या आताच आपल्या विकास कामांना सुरुवात केली असल्याचे दिसत आहे. राज्यातील शिक्षण, रस्ते आणि नोकऱ्यापासून ते पर्यटनविकासासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या सर्व योजनांसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला तब्बल ८ हजार कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी एका वर्तमानपत्रासोबत बोलताना याविषयी माहिती दिली. ज्यावेळी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव हे पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना भेटण्यासाठी गेले होते त्याच वेळी राज्यात नवीन २ बीएसएफच्या दोन तुकड्या निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील २१०० तरुणांना यामुळे नोकऱ्या मिळणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यात तीन बिपीओ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीला ९६ टक्के डिजिटल प्रणालीमध्ये बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्रिपुराला दुबईप्रमाणे एक मोठे व्यावसायिक केंद्र बनवण्याचा सरकारचा विचार असल्याचेही मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)