त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांना मोदींनी केले पाचारण

नवी दिल्ली – वारंवार वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत चर्चेसाठी पाचारण केले आहे. येत्या 2 मे रोजी ते दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी आत्ता पर्यंत अनेक वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत त्याची देशभर खिल्ली उडवण्यात आली आहे.

आजच त्यांनी असे विधान केले आहे की पदवीधर युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता पानाचे ठेले टाकावेत. सध्या ते कोणत्याही विषयावर काहीही वक्तव्ये, करीत आहेत. मध्यंतरी त्यांनी महाभारत काळातही देशात इंटरनेट सेवा कार्यरत होती असे विधान केले होते त्याची देशभर खिल्ली उडवण्यात आली आहे. नागरी सेवा परिक्षांसाठी मॅकेनिकल इंजिनियर्सनी प्रयत्न करू नयेत, केवळ सिव्हील इंजिनियर्सनीच अशा परिक्षा द्याव्यात असे विक्षिप्त विधानही त्यांनी केले होते त्यामुळेही ते अडचणीत आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)