‘त्या’ 23 गावांमध्येही मिळणार प्रॉपर्टी कार्ड

दहा वर्षांपासून रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार

पुणे – पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांतील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बाणेर परिसरातील मिळकतींचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. हे सर्वेक्षण भूमि अभिलेख विभागामार्फत करण्यात आले. “पीएमआरडीए’ने केलेल्या “एरियल सर्व्हे’ची मदत घेऊन पुन्हा एकदा या सर्व गावांतील मिळकतींचे सर्वेक्षण करून प्रॉपर्टी कार्ड तयार केले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे महापालिकेच्या हद्दीत 1997 मध्ये 23 गावे समाविष्ट करण्यात आली. या गावांचे सर्वेक्षण करून तेथील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाला 2 कोटी रुपयांचा निधी महापालिकेने दिला होता. त्यानुसार 2007 मध्ये समाविष्ट गावांतील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र, त्यास परवानगी देण्यास राज्य सरकारकडून विलंब झाला, त्यामुळे हे काम थांबले होते.

राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतरही त्यात अनेक अडचणी निर्माण झाल्याने हे काम थांबले होते. ते आता पूर्ण करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. परंतु गेल्या दहा वर्षांत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत, त्यामुळे या गावांचे नव्याने सर्वेक्षण करावे लागणार आहे. त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च पाहता गेल्या वर्षी “पीएमआरडीए’कडून या सर्व गावांचे “एरियल’ सर्वेक्षण करण्यात आले आहे. गावांच्या हद्दी कायम आहेत. त्यामुळे या सर्वेक्षणाची मदत घेऊन जुन्या नकाशावर सुपर इम्पोज करण्याचा प्रयोग बाणेरमध्ये राबविण्यात आला. तो यशस्वी झाल्याने अन्य गावांमध्येही या पद्धतीने कामकाज करून गावातील मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)