नगर- “त्या’ 16 लाखांच्या विदेशी मद्याचा मालक कोण?

पाथर्डी येथील चालक गजाआड ः एलसीबीने केली कारवाई

नगर – नगर-औरंगाबाद रोडवरील शेंडी बायपासजवळ विदेशी बेकायदेशीपणे वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे. विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी 16 लाख 41 हजार 600 रुपयांचे विदेशी मद्य आणि 3 लाखांचा टेम्पो, असा एकूण 19 लाख 41 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टेम्पो चालक भवनान बन्शी बढे (वय 40, रा. भिलवडे, ता. पाथर्डी) याला अटक केली आहे. विदेशी मद्याचा मालक कोण? त्याचा शोध घेतला जणार का? एमआयडीसी पोलिसांकडे गुन्ह्याचा तपास वर्ग केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाली होती की, नगर-औरंगाबाद रोडवरील शेंडी बायपासने औंरगाबादला विनापरवाना मद्याची टेम्पोतून वाहतूक होणार आहे. शाखेचे सचिन खामगळ, सोन्याबापू नानेकर, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाण, मन्सूर सय्यद, रवींद्र कर्डिले, राम माळी, संतोष लोंढे, राहुल सोळुंके, सचिन अडबल, रवी सोनटक्के, विजय वेठेकरया पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा लावून टेम्पोला पकडले.

टेम्पो औरंगाबादकडे जात असताना पथकाने त्याच्यासमोर खाजगी गाडी आडवी लावली. टेम्पो चालक भगवान बढे याला ताब्यात घेतले. टेम्पोची पाहणी केल्यावर त्यात मद्यांचे बॉक्‍स आढळून आले.परवान्याबाबत विचारल्यावर बढे याने परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी विदेशी मद्य ताब्यात घेतले. पोलीस कर्मचारी राहुल सोळुंके यांनी फिर्याद दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)