‘त्या’ होर्डिंग दुर्घटनेचा अहवाल आहे तरी काय?

तीन महिन्यानंतरही बाबी समोर येईनात


रेल्वे प्रशासनाला जाग येणार तरी कधी?

पुणे – जुना बाजार परिसरातील शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेला तीन महिने पूर्ण होत आहेत. यात चौघांचा मृत्यू, तर काहीजण गंभीर जखमी झाले. याबाबत रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करुन अहवाल तयार केला. मात्र, तीन महिन्यांनंतरही अहवालातील बाबी समोर येत नसून हा अहवाल मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.

शाहीर अमर शेख चौकातील होर्डिंग रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच पडल्याची टीका सर्व स्तरांतून करण्यात आली. यामुळे चौकशीसाठी घटनेच्या दोन दिवसांनी रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापली. यात मध्य रेल्वेचे उपमुख्य अभियंता ए. के. सिंग, उपमुख्य सुरक्षा अधिकारी शिवकुमार, उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. थॉमस तसेच पुणे विभागातील वरिष्ठ सुरक्षा अधिकारी डी. विकास यांचा समावेश होता. यावेळी “पुढील पंधरा दिवसांत अहवाल सादर करू,’ असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, या घटनेला दोन महिने उलटल्यानंतरही अहवाल पूर्ण झालेला नव्हता. दरम्यान, तीन आठवड्यांपूर्वी अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून हा अहवाल मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे सुपुर्द करण्यात आला आहे. यामुळे तो पुणे विभागात नसल्याने त्याबाबत काही सांगता येणार नसल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

कार्यवाही कासवगतीने
मागील तीन महिन्यांपासून होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासन करत असलेली कार्यवाही संथगतीने सुरू आहे. याचमुळे अहवाल तयार करण्यास तीन महिने लागले. यानंतरही हा अहवाल समोर येऊ शकला नसल्याने येत्या काळातही तो समोर येईल का? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)