‘त्या’ हिरकणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

पुणे – खडकवासला कालवा फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी घुसून अबालवृद्ध घरात अडकून पडले होते. यावेळी महिला पोलीस कर्मचारी नीलम गायकवाड देवदूतांसारख्या धावून आल्या व एका लहान मुलास पाठीवर घेऊन ७ ते ८ नागरिकांना पाण्याबाहेर काढले. यानंतर नीलम यांचा एक फोटो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी दाखविलेल्या धैर्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. आता नीलम यांच्या धैर्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे.

नीलम गायकवाड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देत सत्कार करण्यात आला. याशिवाय पोलीस कॉन्स्टेबल संतोष सूर्यवंशी यांनाही त्यांच्या धाडसासाठी गौरविण्यात आले. संतोष सूर्यवंशी यांनी आपला जीव धोक्यात घालून तीन लहान मुले व त्यांच्या मातांना सुरक्षित पाण्याबाहेर काढले होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, शनिवारी जनता वसाहत येथील खडकवासला कालवा फुटी दुर्घटनेच्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून मातृत्वाची जाण ठेऊन झाशीच्या राणीसारखे पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका लहान मुलास पाठीवर घेऊन दोराच्या साहाय्याने ७ ते ८ नागरिकांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. यामुळे  दत्तवाडी पोलिस ठाण्यातील नीलम गायकवाड हिने साक्षात हिरकणीची आठवण जागृत केली आहे. तिच्या या कर्तव्योपरमोधर्म व अतुलनिय धैर्याचा आम्हास अभिमान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

नीलम गायकवाडच्या या धाडसाचे सर्वप्रथम ऑनलाईन वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे पोलीस आयुक्तांनीही नीलम गायकवाड यांची प्रशंसा केली.

 

आणखी वाचा –

दांडेकर पुलावर जलतांडव

महिला पोलीस आले मदतीला धावून

कालवा फुटीनंतर नीलम गायकवाड सोशल मीडियावर हिट


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup:
8 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)