“त्या’ सात जणांना 4 दिवस पोलीस कोठडी

-वासुली उपसरपंच यांच्या कार्यालयावरील हल्ल्‌याप्रकरण :
वाकी – वासुली (ता. खेड) गावच्या उपसरपंच यांच्या पुण्याई कॉम्पलेक्‍समधील सायली ग्रुप या कार्यालयावर मागील आठवड्यात मंगळवारी (दि. 22) हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 7 जणांना 31 ऑगस्टपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.
भंगारमाल व्यावसायिक गुरूदास सदाशिव तेलंग (वय 26, मूळ रा. उस्मानाबाद, सध्या रा. इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे), लेबर कर्मचारी राकेश वासुदेव येवले (वय 25, रा. कान्हेवाडी, ता. खेड, जि. पुणे), प्रथमेश बाळासाहेब दौंडकर (वय 21, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, सध्या रा. खराबवाडी), हिरामण दशरथ शेवकर (वय 28, रा. इंदोरी, ता. मावळ), रोहित अमित चव्हाण (रा. कातवी, ता. मावळ) आणि अभिषेक कृष्णा टाकळकर (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) आणि एक अल्पवयीनचा समावेश आहे. यातील सात जणांना अटक केली असून त्यांना 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहेत. धारदार हत्यारांसह आलेल्या 8 ते 10 जणांच्या टोळक्‍याने वासुली (ता. खेड) गावचे उपसरपंच सुरेश श्रीपती पिंगळे (वय 35, मूळ रा. वासूली, भामचंद्रनगर, ता. खेड, जि. पुणे, सध्या रा. सहयाद्री सोसायटी, मु. पो. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांचे पुण्याई कॉम्पलेक्‍समधील सायली ग्रुप या व्यावसायिक कार्यालयावर मंगळवारी (दि. 22) दुपारी 2 च्या दरम्यान वरील व्यक्‍तींनी दहशतीचा थरार करत हल्ला केला होता. यात कार्यालयातील साहित्यासह एका मोटारीसह दोन दुचाक्‍यांची मोडतोड करून अंदाजे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान केले होते. तसेच मोबाईलवरुन उपसरपंच पिंगळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. चाकण पोलिसांनी याप्रकरणी सनी शिंदे (रा. विठठलवाडी, मु .पो देहगाव, ता. हवेली, जि. पुणे, सध्या रा. कान्हेवाडी, ता. मावळ) यालाही तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले. या सर्वांना खेडच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)