‘त्या’ शेतकऱ्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे व्यथित होऊन शेतातील फुलकोबीचे गड्डे तोडून टाकणाऱ्या शेतकऱ्याला शिवसेनेने धीर दिला. जालन्याचा शेतकरी प्रेमसिंग चव्हाणला स्मृती प्रतिष्ठानकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली.

जालना जिल्ह्यातील पोहेगावमधील शेतकरी प्रेमसिंग चव्हाण याने शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून आपल्या शेतात पिकवलेली भाजी उद्विग्न होऊन तोडून टाकली होती. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बोलावून प्रेमसिंगला धीर दिला. उद्धव ठाकरेंच्या हस्ते ‘स्मृती प्रतिष्ठान’तर्फे प्रेमसिंगला आर्थिक मदतही देण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)