‘त्या’ विधानाबद्दल विद्यार्थ्यांनी विचारला शिक्षणमंत्र्यांना जाब

पुणे – “आर्थिकदृष्ट्या तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका, नोकरी करा’ असे वादग्रस्त वक्‍तव्य करणारे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना गुरुवारी विद्यार्थ्यांनी जाब विचारला. विद्यार्थ्यांची थट्टा करणारे वक्‍तव्य केल्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना केली. दरम्यान, मी असे काही वक्‍तव्य केले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे स्पष्टीकरण तावडे यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र राज्य मुक्‍त विद्यालय मंडळाच्या शुभारंभ आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यक्रमानंतर विविध विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी तावडे यांना प्रश्‍न विचारले. अमरावतीमध्ये आयोजित एका महाविद्यालयीन कार्यक्रमात विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्‍नास “शिक्षण घेणं झेपत नसेल तर सोडून दे आणि नोकरी कर’ असं उत्तर तावडे यांनी दिले होते. त्यावर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमानंतर दयानंद शिंदे, विजयसिंह गिड्डे, शर्मिली येवले, पूजा झोळे आदी विद्यार्थ्यांनी तावडे यांना अमरावतीतील वक्‍तव्याप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली. यावेळी तावडे यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढत मी असे बोललो नाही, काही विद्यार्थी संघटना जाणीवपूर्वक माझ्याविरोधात कटकारस्थान करत आहेत, असे सांगत जर मी असे बोललो असल्याचा पुरावा दाखवल्यास मी जाहीर माफी मागतो, असे आश्‍वासन विद्यार्थ्यांना दिले. त्यावर विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमावरचा व्हिडिओ तावडे यांना दाखवला. दरम्यान, यामध्ये कोठेही तावडे यांनी वरील वक्‍तव्य केल्याचे दिसून आले नाही. मात्र, वादग्रस्त वक्‍तव्य केलेले रेकॉर्डिंग पोलिसांनी डिलीट केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)