“त्या’ विक्रेत्यांवर कारवाई शून्य

पिंपरी – गरम अन्न पदार्थ प्लास्टिक कप अथवा प्लेटमध्ये देणाऱ्या एकाही खाद्य पदार्थ विक्रेत्यावर गेल्या आठ वर्षांत अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.

प्लॅस्टिक कप व प्लास्टिक प्लेटमधील विषारी घटक मानवी आरोग्यास अपायकारक असून, हे कप आणि प्लेटमध्ये अन्न पदार्थ दिल्यास प्लॅस्टिकमधील विषारी घटक माणसाच्या शरिरात मिसळले जातात. आपल्या व्यवसायात प्लॅस्टिक कप व प्लास्टिक प्लेटचा वापर करणाऱ्या शहरातील किती व्यवसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने 1 एप्रिल 2010 ते 31 जानेवारी 2018 या कालावधीत दंडात्मक अथवा फौजदारी कारवाई केली आहे, याची माहिती रामदास जंगम यांनी मागितली होती. मात्र, अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती जंगम यांना अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्‍त तथा जनमाहिती अधिकारी सं. भा. नारगुडे यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सात अन्न सुरक्षा अधिकारी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीकरिता कार्यरत आहेत. त्यांची नावे या माहितीमध्ये देण्यात आली आहेत. मात्र, कारवाई “शून्य’ असल्याने आश्‍चर्य जंगम यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. खाद्यपदार्थ प्लास्टिक प्लेट अथवा कपमध्ये विक्री करण्यास आधीपासूनच बंदी आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. चहा सर्रास प्लास्टिकच्या कपमधून दिला जातो. नागरिकांच्या जिविताशी खेळण्याचा हा प्रकार आहे. त्याकडे अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष संशयास्पद असून अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रामदास जंगम यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)