“त्या’ विकृतास अखेर अटक

पिंपरी – एका वृत्तपत्राच्या उपक्रमातून महिलांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना फोनवरुन अश्‍लिल संभाषण करणाऱ्या विकृतास वाकड पोलिसांनी अटक केले आहे.

प्रशांत शंकर मोरे (वय-30, डेक्कन जिमखाना परिसरातील फिरस्ता, मूळ कल्याण, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही महिलांनी फोनवरुन एक व्यक्ती अश्‍लिल संभाषण करत असल्याची तक्रार वाकड पोलिसांत दाखल केली होती. तपास करत असताना आरोपी फोन करत असलेले सर्व क्रमांक हे एका वृत्तपत्रातील उपक्रमासाठी नेमलेल्या प्रतिनिधी महिलांचे असल्याचे लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक हरिष माने यांनी तांत्रिक तपास करत मोबाईलचा मालक शोधला. यावेळी तो मोबाईल खडकी येथील एका बेकरीवाल्याचा असून तो चोरीला गेल्याचे कळाले. आरोपीने अशा प्रकारे तीन फोन चोरले होते.

या फोनवरुन तो महिलांना करुन अश्‍लिल भाषेत त्यांच्याशी बोलत होता. प्रशांत हा जंगली महाराज रस्त्यावरील चौपाटीवर काम करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिष माने, मोहन जाधव, पोलीस कर्मचारी प्रमोद भांडवलकर, नितीन गेंगजे, शाम बाबा यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)