‘त्या’ वक्तव्याबद्दल महिला आयोगाची राहुल गांधींना नोटीस 

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल करारावरून सातत्याने आक्रमक पवित्रा घेत आहेत. दररोज भाषणांद्वारे अथवा ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर हल्ला चढवीत आहेत. परंतु, यावेळी एका वक्तव्यावरून राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले आहेत. यासाठी त्यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीसही जारी केली असून स्पष्टीकरण मागितले आहे.

राजस्थानमध्ये बुधवारी एका रॅलीदरम्यान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला चढविताना म्हंटले कि, ५६ इंचाची छाती असलेले पंतप्रधान राफेल बाबत बोलण्यासाठी एकदा पण सभागृहात उभा राहिले नाहीत. त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी एका बाईचा आधार घेतला मात्र त्या देखील मोदींना वाचवू शकल्या नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका होत असून राष्ट्रीय महिला आयोगानेही गंभीर दाखल घेतली आहे. महिला आयोगाने राहुल गांधी यांच्याविरुद्ध नोटीस जारी करत टीका त्यांच्या वक्तव्याची टीका केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)