‘त्या’ लोकांना दोन ठिकाणी मतदानाचा अधिकार आहे का ?

शेतीमित्र अशोकराव थोरात यांचा सवाल

कराड – मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी विनाकारण कृष्णा हॉस्पिटलच्या मतदारांचा मुद्दा उगाळण्यापेक्षा, शिंदे यांच्या घराच्या पत्त्यावर नोंद असलेले लोक स्वत:चे दुबार मतदान वगळणार आहेत की नाहीत? की मनोहर शिंदेंच्या संबंधित लोकांना दोन ठिकाणी मताचा अधिकार मिळालाय? असा सवाल शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी केला आहे. मलकापूरचे माजी नगरसेवक गजेंद्र बुधावले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कृष्णा हॉस्पिटलच्या पत्त्यावर नोंद असलेल्या मतदारांचा मुद्दा उपस्थित केला आहे. पण या मुद्यात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

-Ads-

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात थोरात यांनी म्हटले आहे, की मलकापूरमध्ये 439 बोगस, मयत व दुबार मतदार नोंद असल्याची कागदपत्रे व पुराव्यानिशी माहिती आम्ही पत्रकार परिषदेत सादर केली. तसेच सुमारे 55 मतदार हे केवळ एकट्या माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या घराच्या पत्त्यावर नोंद आहेत. यामध्ये बुधावले यांच्या नावाचाही समावेश असल्याचे आम्ही उघड केले होते. मनोहर शिंदे यांचे हे बिंग फुटल्याने त्यांच्या बगलबच्च्यांनी आता कृष्णा हॉस्पिटलमधील मतदारांचा तथ्यहीन मुद्दा उकरुन काढला आहे.

मुळात कृष्णा हॉस्पिटलमधील डॉक्‍टर्स व कर्मचाऱ्यांसाठी पूर्वीपासूनच घरे उभारण्यात आली आहेत. बरेच लोक 20 वर्षांहूनही अधिक काळ येथे वास्तव्य करत आहेत. त्यांच्या नावाबाबत कुणाला आक्षेप असतील तर ते पुराव्यानिशी त्यांच्यावर आक्षेप नोंदवू शकतात. पण कृष्णा हॉस्पिटलमधील मतदारांचा मुद्दा काढून संभ्रम निर्माण केला जात असून, आपले बोगस मतदार लपविण्यासाठी शिंदे व त्यांचे समर्थक हे कारस्थान करत आहेत, असा आरोप अशोकराव थोरात यांनी केला आहे.

आम्ही परवाच्या पत्रकार परिषदेत मनोहर शिंदे यांच्या सख्या बहिणीचे मतदान मलकापूर व सोनसळ अशा दोन्ही ठिकाणी, तसेच मामे बहिणीचे मतदान मलकापूर व खुबी अशा दोन्ही ठिकाणी असल्याचे उघड केले आहे. तसेच त्यांच्या घराच्या पत्त्यावर राहणार्या अनेकांचे मतदान मलकापूर शहर व कराड शहरातही असल्याचे दाखवून दिले आहे. ज्यांचा उल्लेख ते संभाव्य उमेदवार म्हणून करतात, त्या अश्विनी मोहन शिंगाडे यांचेही दोन ठिकाणी नाव नोंद आहे. असे दुबार मतदार असणारे हे लोक आपले एका ठिकाणचे मतदान कमी करणार आहेत की नाही, हा खरा प्रश्न आहे. की मनोहर शिंदेंच्या समर्थकांना बेकायदेशीरपणे दुबार मतदान ठेवण्याचा परवाना मिळाला आहे.

व्यक्तिदोष करण्याइतके मनोहर शिंदे काही मोठे नाहीत. आत्ताची निवडणूक झाल्यानंतर मनोहर शिंदे कोण होते हे लोकं ओळखणार सुध्दा नाहीत. अशा वेळी नाहक मुद्दे काढून नागरिकांत संभ्रम निर्माण करण्यापेक्षा मलकापूरातील दुबार, मयत व बोगस मतदान कमी करण्यासाठी मनोहर शिंदे व त्यांच्या समर्थकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन थोरात यांनी केले आहे.

आम्ही नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोहर शिंदे यांच्या सख्या बहिणीचे मतदान मलकापूर व सोनसळ अशा दोन्ही ठिकाणी तसेच मामे बहिणीचे मतदान मलकापूर व खुबी अशा दोन्ही ठिकाणी असल्याचे यापूर्वीच उघड केले आहे. त्यांच्या बहिणींचे दोन ठिकाणी मतदान असताना त्याबाबत ते चकार शब्दही का बोलत नाहीत? की त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे? असा सवालही शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी उपस्थित केला आहे.


ही माहिती पृथ्वीराजबाबांनी विधानसभेत का दिली नाही?

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आजच विधानसभेत कराड दक्षिणमध्ये 1,331 ऑनलाईन अर्ज मतदान वगळण्यासाठी आले आहेत, असे सांगितले. त्यामध्ये मलकापूरमधील 439 लोकांचा समावेश आहे का? मलकापूरमधील ऑनलाईन ऑब्जेक्‍शन आलेले मतदार एकतर मयत आहेत किंवा दुबार आहेत. तसेच मलकापूरमध्ये वास्तव्यास नसलेले आहेत. ही माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत का दिली नाही? पृथ्वीराज चव्हाण व कॉंग्रेस पक्ष यांचे समर्थक, कार्यकर्ते व संभाव्य उमेदवार हे मयत किंवा दोन-दोन ठिकाणी मतदान करणारे आहेत का? याचाही खुलासा आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी करणे आवश्‍यक आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)