त्या लाचखोर सहायक आयुक्ताला पोलीस कोठडी

पुणे – सिव्हिल वर्कच्या वेळी कर कमी भरल्याचे सांगत असेसमेंटची ऑर्डर कंत्राटदाराच्याविरोधात अपिलामध्ये न जाण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडलेल्या पुण्यातील जीएसटी (वस्तू व सेवा कर) कार्यालयातील सहायक आयुक्ताला एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा आदेश दिला आहे.
प्रसाद पुरुषोत्तम पाटील, (वय 48, प्रसादनगर, वडगाव शेरी, पुणे) असे पोलीस कोठडी झालेल्या सहायक आयुक्ताचे नाव आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कंत्राटदार आहेत. त्यांनी 2013 मध्ये केलेल्या सिव्हिल वर्कचे कामाचे वेळी 5 टक्के व्हॅट होता. त्याप्रमाणे त्यांनी कर भरलेला होता. प्रसाद पाटील यांनी त्यांना तुम्ही कर कमी भरला आहे. तो आठ टक्क्‌याप्रमाणे भरावयाचा आहे. त्याप्रमाणे तक्रारदार यांना असेसमेंटची ऑर्डर त्यांच्या विरोधात जाऊ नये, यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देणे तक्रारदारांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार एसीबीकडे केली होती. त्यानुसार पाटील याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यात आणखी कोणाचा समावेश आहे ?, त्याने यापूर्वी अशा पध्दतीने किती जणांकडून पैसे घेतले आहेत, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)