“त्या’ मेंढपाळांना शासनाकडून आर्थिक मदत

सुदवडी (ता. मावळ) : नुकसानग्रस्त मेंढपाळांना शासनाकडून 93 हजारांचा धनादेश आमदार संजय भेगडे यांच्या हस्ते देण्यात आला.

तळेगाव-दाभाडे, (वार्ताहर) – सुदवडी (ता. मावळ) हद्दीत सोमवार (दि. 12) सायंकाळी वीज पडल्याने 31 शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू झाला होता. त्या कुटुंबाचे या घटनेमुळे मोठे नुकसान झाले. त्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली असून 93 हजाराचा धनादेश देण्यात आला.

मेंढपाळ अंबू गोपाल शिंगोटे व बाळू गोपाल शिंगोटे यांच्या जनवारांच्या कळपात वीज पडून कुत्र्यासह 31 शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला. मावळचे आमदार संजय भेगडे यांच्या पुढाकाराने राज्य शासनाकडून तातडीची मदत म्हणून 93 हजारांचा धनादेश आमदार संजय भेगडे यांच्या हस्ते कुटुंबीयांना शुक्रवारी (दि. 16) देण्यात आला.

सभापती गुलाबराव म्हाळसकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, संदीप काशीद, मधुकर ढोरे, सरपंच सदानंद टिळेकर, जगन्नाथ शेवकर, बाळू कराळे, मोहन तांबे, सूर्यकांत मोईकर, राजू कराळे, मंडलाधिकारी अजय सोनवणे, तलाठी मनिषा निंबोळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)