त्या मुद्यांमध्ये सत्यता नाही – रॉजर फेडरर 

लंडन, दि. 15 – सार्वकालीन महान टेनिसपटू रॉजर फेडररने आपल्या टीकाकारांना उत्तर देताना सांगितले आहे की, त्याची बाजू कमकुवत करून जे मुद्दे मांडले जात आहेत त्यात नेमकी सत्यता नाही. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपल्या लौकिकाचा फायदा घेत फेडरर स्वत:चे सामने दिवसाच्या कडक उन्हा ऐवजी रात्री ठवण्यासाठी दबाव आणतो. अशी टीका फेडररवर होत आहे.

पुरुष एकेरीत सार्वधिक ग्रॅंडस्लॅम जिंकणाऱ्या फेडररवर फ्रान्सचे माजी टेनिसपटू खेळाडू ज्युलियन बॅनेट्युव फ्रान्समधील आरएमसी स्पोर्टला दिलेल्या मुलाखतीत टीका करत म्हणाला की, मागील दोन्ही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजेता ठरलेला फेडरर 14 सामने खेळला आहे. दोन्ही वेळा तो अंतिम सामन्यात पोहचल्याने त्याला जास्त सामने खेळायला मिळाले. त्यातील 12-13 सामने तो रात्रीच्यावेळी खेळला आहे. मेलबर्न हीटचा फटका बसू नये म्हणून तो त्याचे सर्व सामने रात्रीच्या वेळेला ठेवण्याचे सुचवतो आणि याची त्याला परवानगी भेटते. त्याने टेनिससाठी जे केले ते पाहता त्याला त्याला विशेष दर्जा दिला जावा हे वावगे नाही परंतु बाकी खेळाडू 100 डिग्रीच्या तापमानाच्या परिस्थितीचा कसा सामना करतात, याची त्याला कल्पना नाही का? असा स्वालही त्याने यावेळी केला होता. त्याच्या प्रत्युत्तरादाखल फेडररने आपले मत व्यक्त केले होते.

सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या नोवाक जोकोविचने या मुद्यावर सोमवारी भाष्य केले आणि म्हणाला, फेडररने जे टेनिससाठी केले आहे. त्या मुळे त्याला विशेष सवलत दिली जावी यात काही वागवे नाही. त्याने हे लौकिक त्याच्या खेळातून प्राप्त केले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे सचिव क्रेग टायले यांनी याबाबत भाष्य करत म्हटले आहे की, फेडररच्या सामन्याच्या वेळा या त्याचा लौकिक पाहता ठरवल्या जात नसून येथील प्रेक्षकांच्या इच्छेमुळे त्याचे सामने रात्री ठेवले जातात.

या सर्व गोष्टींवर फेडररला विचारले असता त्याने सांगितले, मी माझ्या वेळा ठरवण्यासाठी स्पर्धेच्या सचिवांशी बोललो. परंतु, मला कोणतीही विशेष सवलत मिळते असे मला वाटत नाही. मी त्यांना सोमवारी मंगळवारी माझे सामने ठेवायला काही वेळा विचारले आहे. त्यात कधी मला ते वेळा देतात तर कधी माझ्या मनाविरुद्धही खेळावे लागते. अमेरिकन ओपनमध्ये सोमवारी सामना खेळायची माझी इच्छा होती परंतु तेथील आयोजकांनी मंगळवारी रात्री माझा सामना ठेवला.

पुढे बोलताना फेडरर म्हणाला, खेळाडू म्हणून अशा गोष्टीना तुम्हाला सामोरे जावेच लागते. मला तर मागील 20 वर्षांपासून या या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेविषयी बोलण्यात मला काहीच रस नाही. हे सर्व प्रकरण फ्रेंच ओपन स्पर्धेच्यावेळी झालेले आहे. माझ्यावर टीका कारणाऱ्या ज्युलियन बॅनेट्युवला मी लहानपानपासून ओळखतो. तो एक चांगला माणूस आहे. मला वाटते त्याने केलेल्या टीकेमध्ये सत्यतेचा अभाव आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)