त्या माओवाद्यांच्या स्थानबद्धतेची मुदत वाढवली

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणि माओवादी विचारांच्या 5 कार्यकर्त्यांच्या स्थानबद्धतेची मुदत सर्वोच्च न्यायालयाने आणखी 5 दिवसांसाठी वाढवली. या माओवाद्यांचे वकिल ऍड. अभिषेक मनू सिंघवी हे अन्य कामामध्ये व्यस्त असल्याने इतिहासतज्ञ रोमिला थापर आणि अन्य चौघांच्या याचिकेवरील सुनावणी 17 सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

वरावरा राव, अरुण परेरा, वेमोन गोन्सालविस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा या पाच जणांच्या याचिकेवर सुनावणी होणार होती. दुपारी ऍड. सिंघवी यांनी न्यायालयात उपस्थित राहून सुनावणी दुपारी करण्याची विनंती केली होती. मात्र ते व्यस्त असल्याचे लक्षात आल्यावर सुनावणी 17 सप्टेंबरला करण्याचे निर्देश सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली न्या.ए.एम. खानविलकर आणि न्या. डी.वाय चंद्रचूड यांच्या पिठाने दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)