“त्या’ भंगार व्यावसायिकांना दणका

पिंपरी – चिखली, मोशी, कुदळवाडी परिसरातील भंगार व्यावसायिक दुरुउपयोगी साहित्याची जाळून विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात धूर व दुर्गंधी पसरते. याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वायूप्रदुषण करणा-या भंगार व्यावसायिकांना पालिकेतर्फे देण्यात येणा-या सोयी-सुविधा बंद कराव्यात. भंगार व्यावसाय सात दिवसात बंद करावा, असे सक्त निर्देश आमदार महेश लांडगे यांनी पालिकेच्या अधिका-यांना दिले आहेत. तसेच चाकण आणि परिसरातील घनकचरा पाठविणा-या कंपन्यांनाही नोटीस देण्याच्या सूचना त्यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी चिखलीतील कंपनीला आग लागली होती. त्याचा रिव्हर रेसिडन्सीमधील नागरिकांना मोठा त्रास झाला. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी प्रदुषण नियंत्रण मंडळ, महावितरण, महापालिका पर्यावरण, अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांसह परिसराची पाहणी केली. यावेळी नगरसेविका अश्विनी जाधव, नगरसेवक वसंत बोराटे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस, उत्कार्ष शितगाटे, पर्यावरण निरीक्षक एच.ए.मुल्ला, अतिक्रमण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता सी.बी.कोंडे उपस्थित होते. भंगार व्यावसायिकांमुळे झालेली विदारक परस्थिती पाहून आमदार लांडगे यांनी अधिका-यांना फैलावर घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदार महेश लांडगे म्हणाले की, चिखील, मोशी, कुदळवाडी या ठिकाणी नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात भंगार, जुन्या वस्तू, प्लास्टिक वस्तू गोळा करणारे व्यावसायिक आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात गोडावने आहेत. व्यावसायिक वापरासाठी योग्य नसलेल्या साहित्याची जाळून विल्हेवाट लावतात. त्यामुळे या धूर आणि दुर्गंधीयुक्त वायू पसरतो. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. रहिवाश्‍यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

संबंधितांना नोटिसा बजावा…
‘भंगार जमा करणा-या व्यावसायिकांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे मानवी जीवनास हानीकारक होणा-या वस्तूचे राजरोसपणे विघटन होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जे भंगार व्यावसायिक वायू प्रदुषण करत आहेत. त्यांना व्यावसायाकरिता लागणा-या सुविधा पाणीपुरवठा, विद्युत जोडणी कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस द्यावी. येत्या सात दिवसात भंगार व्यावसाय बंद करावा. या ठिकाणी चाकण आणि आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या कंपन्यांचा नागरी घनकचरा पाठवण्यात येतो. त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात यावी, असे निर्देश आमदार लांडगे यांनी अधिका-यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)