त्या’ बॅंकांचा महापालिकेला ठेंगा

11 गावांच्या बॅंक खात्यामधील निधी देण्यास नकार


पालिकेने पाठविली 100 हुन अधिक पत्रे : प्रशासन हतबल


 

पुणे:  राज्यशासनाने महापालिकेत समाविष्ट 11 गावांच्या आर्थिक स्थितीची घडी महापालिका प्रशासनास अजूनही बसविता आलेली नसतानाच या गावाची बॅंक खाते असलेल्या बॅंकांनी महापालिकेला ठेंगा दाखविला आहे. या बॅंकांकडे जमा असलेल्या 10 कोटी रुपयां मधील 3 हजार पालिकेला वर्ग केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या बॅंकांना तब्बल 103 हुन अधिक पत्र पाठविण्यात आल्यानंतरही ही रक्कम महापालिकेस मिळाली नसल्याचा खुलासा चक्क पालिका प्रशासनाकडूनच बुधवारी मुख्यसभेत करण्यात आला. याची गंभीर दखल घेत महापौर मुक्ता टिळक यांनी या प्रकरणी आयुक्तांनी तातडीने या बॅंकांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा असे आदेश दिले. मात्र, त्यामुळे एका बाजूला सर्वसामान्यांकडून पार्किंगसाठी 10 रूपये वसूल करण्यासाठी कंबर कसलेल्या महापालिका प्रशासनाला आपलाच हक्काचा निधी बॅंकाकडून वसूल करता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.
बुधवारी झालेल्या मुख्यसभेत आंबेगाव खुर्द गावाचे 3 लाख रुपयांचे पाणी वीज बिल थकले असल्याचे सांगत. ही थकबाकी का भरली जात नाही असा सवाल उपस्थित केला.तसेच या गावाचे 56 लाख रुपये बॅंकेत असतानाही ती का भरली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पाणी पुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी कुलकर्णी यांनी या गावाची जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगितले. त्यानंतर या गावाच्या खर्चाबाबत मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांनी खुलासा केला.या गावाची सुमारे 10 कोटींची रक्कम बॅंकेत जमा आहे.मात्र, त्यातील अवघे 3 हजार रुपये पालिकेच्या खात्यात जमा झाले आहे.मात्र, हे आद्यपही पालिकेला मिळालेले नाहीत.त्यामुळे हे पैसे असलेल्या बॅंकांना आपण 100 हुन अधिक पत्र पाठविली आहेत.मात्र, त्याच्याकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे पालिकेला केवळ 3 हजार रुपये आले आहेत.त्यामुळे या गावासाठी निधी नसल्याचे कळसकर यांनी सांगितले. तर या गावांचे थकबाकीचे बील तातडीने भरण्यात येणार असून कोणत्याही गावचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असल्याचेही प्रशासनाकडून यावेळी मुख्यसभेत सांगण्यात आले.

अशी आहे या गावाची आर्थिक सद्यस्थिती
आर्थिक बाबींच्या दप्तरानुसार, या गावांना 1 एप्रिल 2017 पासून सप्टेंबर 2017 अखेरपर्यंत सर्व प्रकारे 56 कोटी 86 लाख, 51 हजार 668 रुपयांचा महसूल मिळालेला आहे. त्यातील तब्बल 46 कोटी 19 लाख 37 हजार 747 रूपयांचा निधी खर्ची पडला आहे. त्यामुळे या गावांकडे अवघे 10 कोटी 67 लाख 13 हजार 920 रुपये शिल्लक असून ही रक्कम तसेच गावांची बॅंक खाती अजूनही पालिकेच्या ताब्यात आलेली नाहीत. तर या गावांमधून जमा होणारा महसूल महापालिकेकडून अद्यापही त्याच गावांच्या बॅंक खात्यात जमा केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)