“त्या’ बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले

उंब्रज – खालकरवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत पट्टी नावाच्या शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्यास वनविभाग व पोलिस यांनी नागरिकांच्या मदतीने गुरुवारी पिंजऱ्यात सुरक्षित जेरबंद केले होते. त्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता तो तंदुरुस्त असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात गुरुवारी रात्री उशिरा सोडून देण्यात आले असल्याची माहिती कराड वनक्षेत्रपाल अजित साजणे यांनी दिली.

कराड तालुक्‍यातील खालकरवाडी येथील विहीरीत गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पाणी पाजण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यास बिबट्या फुटबॉलच्या पाईपला घट्ट धरुन बसल्याचे दिसला. त्यानंतर सरपंच यांनी टोल फ्री नंबर वरुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, कराडचे वनक्षेत्रपाल डॉ. अजित साजने हे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रेस्कू ऑपरेशन करीत बिबट्यास विहिरी बाहेर काढला. त्यानंतर दुपारी वराडे येथील वनविभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी भोसले यांनी बिबट्याची तपासणी केली असता तो तंदुरुस्त असल्याचे सांगून वनविभागाने रात्री उशिरा नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)