त्या बापलेकीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

नातेवाईकांच्या आक्रोशाने गिरवी हळहळली
फलटण, दि. 2 (प्रतिनिधी) -गिरवी, ता.फलटण गावच्या हद्दीतील शेरीमळा नजीक काल बापलेकीचा निर्घुण खून करण्यात आला होता. त्यांच्यावर काल रात्री 11.30 च्या सुमारास एकाच चितेवर शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांच्या आक्रोशाने गिरवी हळहळली.
गिरवी, ता. फलटण येथील किरण उर्फ पंकज भुजंगराव कदम (वय 33) हे त्यांची मुलगी कार्तिकी किरण कदम (वय 2) हिला घेऊन दि. 1 रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असणार्‍या शेतात जनावरांना मका आणण्यासाठी गेले होते. ते परत न आल्याने शोधाशोध केल्यावर घरा शेजारील विहीरीत त्यांचे मृतदेह मिळुन आले होते.

याबाबत मृत किरण कदम यांचे वडील भुजंगराव सुभेदार कदम यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पुतण्या आकाश कदम यानेच मुलगा किरण व नात कार्तिकी यांचा खून केल्याची फिर्याद दिली ओहे. त्यांनी म्हटले आहे की, आकाश कदम हा आमच्या घराशेजारी राहण्यास आहे. त्याच्या घराच्या शेजारी असणार्‍या आमच्या शेतामध्ये मुलगा किरण मका तोडण्यासाठी गेला होता.मक्याच्या शेतातून आकाशच्या घराच्या मागून डाळींबीच्या शेतातून किरण याचे प्रेत ओढत नेल्याचे दिसत होते. यानंतर तो किरण व कार्तिकी यांना शोधण्यासाठी न जाता घरामध्येच थांबून राहिला व थायमेट खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावरुन मुलगा किरण व नात कार्तिकी यांचा खुन केल्याची फिर्याद भुजंगराव कदम यांनी दिली.
दरम्यान, रात्री गिरवी येथे मृत किरण आणि कार्तिकी यांच्यावर एकाच चितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

आकाशवर आणखी एक गुन्हा
आकाश कदम यांच्यावर खुनाबरोबर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल विक्रांत हणमंत लावंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण व कार्तिकी कदम यांच्या मृतदेहापासून काही अंतरावर एका घरासमोर एक इसम अत्यवस्थ दिसला. त्यांच्याकडे जाऊन चौकशी केली असता रागाच्या भरात माझ्याकडून चूक झाली आहे व आता मला पोलिस पकडतील या भीतीने मला टेंशन आले आहे. त्यामुळे मी घरात असणारे थायमेट औषध खाल्ले आहे, असे संशयित आरोपी आकाशने पोलिसांना सांगितले. त्यामुळे आत्महत्या केल्याप्रकरणी आकाश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)