“त्या’ बांधकामांवर नियंत्रणाचा प्रयत्न!

पिंपरी – प्रत्येक शहराला नियोजनाची गरज आहे. मागील नगररचना योजनेच्या कायद्यात बदल केल्याने सद्यस्थितीत या योजनेला नागरिकांचा प्रतिसाद वाढणार आहे. तसेच, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या परिसरात अनियंत्रित बांधकाम सुरु असून त्यावरती नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, मत पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड प्रेस क्‍लबतर्फे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात गित्ते बोलत होते. यावेळी, पीएमआरडीए राबवित असलेला वाहतूक आराखडा, रिंग रोड, नगररचना योजना, शहरातील उड्डाणपूल, रस्ते, ग्रेड सेपरेटर आदींबाबत माहिती त्यांनी दिली.

-Ads-

गित्ते म्हणाले, “पीएमआरडीए’च्या स्थापनेला तीन वर्ष झाली असून त्या माध्यमातून अनेक कामे सुरु आहेत. शहरात बांधकाम व्यवसायिकांनी नागरिकांना रस्ते, पाणी, वीज या गोष्टी दिल्यानंतर “पीएमआरडीए’ने परवानगी देत आहे. पुणे व पिंपरी शहरातील हडपसर, उरुळी कांचन, खराडी, हिंजवडी, पिरंगुट, तळेगाव दाभाडे, चाकण या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती व आयटी हब विकसित झालेली आहे. या परिसराचा पीएमआरडीच्या माध्यमातून वेगाने विकास होत आहे. या कार्यक्षेत्रात सुमारे 77 लाख 50 हजार लोक राहत असून त्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका व पीएमआरडीए करत आहे.

शहराचा विकास करायचा असल्यास शहरातून पैसा उभा करुन त्याच ठिकाणी खर्च केला पाहिजे. “पीएमआरडीए’च्या माध्यमातून पहिली नगररचना योजना, म्हाळुंगे-माण हायटेक सिटी विकसित केली जात आहे. यापुढे, नगर रचना योजना राबवून विकास करण्याचे उदिष्ट “पीएमआरडीए’चे आहे. तसेच, “रिंगरोड’चे काम लवकरच सुरु होणार असून 20 लाख लोकसंख्या रिंगरोड अंतर्गत सामावून घेतली जात आहे. “पीएमआरडी’च्या अंतर्गत शिरुर ते खंडाळा व पुरंदर ते खेड या दरम्यानचे क्षेत्र येत असून त्यादृष्टीने पुढील वीस वर्षाचा आराखडा तयार करुन त्या पद्धतीने काम सुरु असल्याचे, त्यांनी सांगितले.

वाहतूक व्यवस्थेचा विस्तृत आराखडा
मेट्रोच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील विविध मार्ग, वाहतूक आराखडा, रिंगरोडवरील नगररचना योजनेतील 14 टी. पी. स्किम आणि या कार्यक्षेत्रातील सुमारे 77 लाख लोकसंख्येचा विचार करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत विस्तृत आराखडा तयार करुन तो राबविण्याचे काम एल ऍण्ड टी कंपनीला दिले आहे. यामध्ये, सिंगापूर येथील एका कंपनीचेही सहकार्य घेण्यात आल्याचे, किरण गित्ते यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)