“त्या’ बसेसचे सांगाडे वल्लभनगर आगारात

पिंपरी – मागील आठवड्यात मराठा क्रांती मोर्चाच्या सभेनंतर चाकणमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनांमध्ये खाक झालेल्या 12 एस. टी. बसेसचे सांगाडे वल्लभनगर येथील आगारात आणण्यात आले आहेत. ते पाहून आंदोलनाच्या आठवणी ताज्या होत असतानाच बसेसचे नुकसान काळजाला चटका लावून जात आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरुन आक्रमक झालेल्या आंदोलकांनी 29 जुलैला चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारात पीएमपी बस, एस. टी. बस व अनेक खासगी वाहने पेटवली होती. शिवाजीनगर, नारायणगाव, राजगुरुनगर या आगाराच्या एकूण 12 बस आंदोलकांनी जाळल्या होत्या, त्या बसचे सांगाडे 3 ऑगस्टला पार्किंगसाठी वल्लभनगर आगारात आणण्यात आले. मात्र, वल्लभनगर आगार प्रशासन व आगार प्रमुख यांच्या सतर्कतेमुळे वल्लभनगर आगाराच्या तीन बसचे नुकसान होता-होता राहिले. आंदोलन पेटले असता ओतुर, जुन्नर, आसाने या ठिकाणी गेलेल्या गाड्या वल्लभनगरला परत येत होत्या. मात्र आंदोलन पेटल्याची बातमी आगाराला समजताच आगारातून चालक आणि वाहक यांच्याशी संपर्क करुन गाड्या मंचरलाच थांबवण्याच्या सूचना करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेळीच सूचना पोचली नसती तर वल्लभनगर आगाराच्या तीन गाड्यांचेही नुकसान झाले असते. आगार प्रशासन व चालक-वाहक यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे. चाकणमध्ये झालेल्या हिंसाचारात पीएमपीच्या 13 गाड्या पेटवल्या तर एस. टी. च्या 12 गाड्या पेटवल्या होत्या आणि खासगी 125 वाहनांची तोडफोड करुन पोलीस चौकी व प्रवासी तपासणी पथकाची सुमो गाडी सुद्धा आंदोलकांकडून जाळण्यात आली होती. आंदोलनाचा गेल्या दहा दिवसात फेऱ्या रद्द झाल्या कारणाने 40 ते 50 लाखाचा फटका वल्लभनगर आगाराला बसला आहे, अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे.

आंदोलन भडकल्यावर कुठल्या मार्गावर आंदोलन आहे. त्याची माहिती सुरवातीला मिळवली नंतर आमच्या कुठल्या गाड्या त्याच मार्गावरुन येत आहेत त्यांना सतर्क करण्यात आले. आंदोलन काळात गाड्या जाणाऱ्या मार्गावरील कंट्रोलरशी चर्चा करुनच गाड्या पुढे पाठवण्यात येत होत्या व चालक-वाहकांच्या सतत संपर्कात असल्यामुळे होणार नुकसान टाळता आले.
– संजय भोसले, आगार प्रमुख, वल्लभनगर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)