“त्या’ प्रियकरावर गुन्हा दाखल

पिंपरी – प्रेयसीसोबतच्या खासगी क्षणांचे तिच्या नकळत अश्‍लील व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

याप्रकरणी पंकज रामचंद्र माने (वय-38, रा. सातारा) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज आणि पीडित तरुणीची “लींकड इन’ या सोशल साईटवरुन ओळख झाली. त्यातूनच मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पीडित तरुणीच्या संमतीने पंकजने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. दरम्यान त्याने तिच्या नकळत अश्‍लील व्हिडिओ बनवले. ते व्हिडिओ पंकजने तिच्या मित्र-मैत्रिणींच्या व्हाट्‌सऍप आणि फेसबुकवर पाठवले. तसेच पंकजने “मी माझ्या जीवाचे बरे-वाईट करून तुला अडकवीण’ अशी धमकी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)