“त्या’ प्राध्यापकांच्या मानधनात दुपटीने वाढ

पुणे – शासनाने अनुदानित महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या (सीएचबी) प्राध्यापकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे प्राध्यापक वर्गातून स्वागत होत आहे. गेल्या सात-वर्षांपासून वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापकांच्या 40 टक्‍के रिक्त जागा भरण्यास शुक्रवारी शासनाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्यात आल्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाने शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.

सध्या सेट-नेट उत्तीर्ण उमेदवारांची संख्या मोठी आहे. मात्र, राज्य शासनाने प्राध्यापकांवर बंदी घातल्याने उमेदवारांमध्ये नैराशाची भावना होती. त्यामुळे उमेदवार सीएचबीची संधी शोधत होते. त्यातच सीएचबीवर अध्यापन करीत असताना मानधन मात्र तुटपुंजे होते. मात्र, हा अनुभव पुढे कामी पडेल, या आशेने सीएचबीवर प्राध्यापक अध्यापन करायचे. आता मात्र मानधनात वाढ केल्याने किमान सीएचबीवर काम करणाऱ्या प्राध्यापकांना किमान प्राथमिक गरजा तरी पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)